"From Our Farm to Your Home"
Pure | Fresh | Natural | Direct from Farm | To Your Doorstep
आजच्या धावपळीच्या युगात भेसळमुक्त, रसायनमुक्त आणि अस्सल देशी चवीचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून आम्ही प्युअर माती (PureMati) ची स्थापना केली. आमचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या कष्टाला थेट ग्राहकांच्या स्वयंपाकघराशी जोडणे हा आहे.
आम्ही कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा घातक कीटकनाशकांचा वापर न करता, पारंपरिक शेणखत, जीवामृत आणि देशी गाईंच्या साहाय्याने नैसर्गिक शेती करतो. पहाटे शेतातून तोडलेला भाजीपाला त्याच दिवशी तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो.
केवळ जीवामृत, दशपर्णी अर्क आणि सेंद्रिय खतांचा वापर. शून्य रसायने.
गिर व खिल्लार गाईंचे शुद्ध A2 दूध आणि पारंपरिक लाकडी घुसळणीचे साजूक तूप.
शेतकऱ्याला रास्त भाव आणि ग्राहकांना वाजवी दरात थेट शेतमाल.